स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून चोरीला गेली
By Admin | Published: August 25, 2016 07:51 PM2016-08-25T19:51:22+5:302016-08-25T19:51:22+5:30
भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांची गोपनीय माहिती लीक झाली नसून ती चोरीला गेल्याचे फ्रेंच सरकारच्या सुत्रांकडून समजते.
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २५ - भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांची गोपनीय माहिती लीक झाली नसून ती चोरीला गेल्याचे फ्रेंच सरकारच्या सुत्रांकडून समजते.
आत्तापर्यंत स्कॉर्पिन पाणबुड्यांची कार्यरत पैलूंची माहिती प्रकाशित झाली आहे. स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून ती चोरीला गेली आहे, असे या सुत्रांनी सांगितले. तसेच, चोरी करणारा हा माजी फ्रेंच कर्मचारी असून आत्तापर्यंत ‘डीसीएनएस’कडून आम्हाला निष्काळजीपणा झाल्याचे दिसले नाही, परंतू आम्ही याबाबतीत अप्रामाणिकपणा दाखविणा-या या व्यक्तीचा शोध घेत आहोत असेही या सुत्रांनी सांगितले.
भारतीय नौदलासाठी बांधण्यात येत असलेल्या ‘स्कॉर्पिन’ पाणबुड्यांची लढाऊ क्षमता व बलस्थानांसंबंधीची गोपनीय माहिती लीक झाल्याची बातमी ऑस्ट्रेलियातील ‘दि ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने ही बातमी बुधवारी प्रसिद्ध केली असून यामुळे मोठ्याप्रमाणात खळबळ माजली आहे.