स्मृती इराणी यांना माहिती व प्रसारण मंत्रिपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:09 AM2017-07-18T11:09:43+5:302017-07-18T11:33:52+5:30
स्मृती इराणी यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला आहे. नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडी शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आले असून माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. व्यंकय्या नायडू लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेत, व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवली आहे, असंही अमित शहा म्हणाले आहेत.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर करण्यात आले आहे. दक्षिणेत भाजपाला मजबूत करण्यासाठी व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे. व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे ज्येष्ठ आणि जाणकार नेते म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
Shri @MVenkaiahNaidu has resigned from his ministerial responsibilities. Additional charge of @Moud_India has been given to Shri @nstomar.
— PMO India (@PMOIndia) July 18, 2017
The additional charge of the Ministry of I&B has been given to @smritiirani.
— PMO India (@PMOIndia) July 18, 2017