फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 09:06 AM2018-04-03T09:06:40+5:302018-04-03T09:06:40+5:30

फेक न्यूजबद्दल कठोर पावलं उचलली जाणार आहेत.

information and broadcasting ministry frames rules to blacklist journalists claims increase in fake news | फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

Next

नवी दिल्ली- सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फेक न्यूजचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. पण आता फेक न्यूजबद्दल कठोर पावलं उचलली जाणार आहेत. फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता कायमस्वरुपी रद्द होणार आहे. फेक बातम्यांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी मान्यताच रद्द केली जाणार आहे. फेक न्यूजची व्याख्या मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केली नसली तरी विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आला आहे.

सोमवारी माहिती व प्रसारण खात्याने जाहीर केलेल्या पत्रकानुसार प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन या नियामक संस्थांना फेक न्यूज म्हणजेच खोटी बातमी कोणती हे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहे. फेक न्यूजसंदर्भात या यंत्रणांकडे तक्रार दाखल केल्यावर अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची नोंदणी चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केली जाईल. १५ दिवसांमध्ये ही चौकशी पूर्ण करावी, असं या पत्रकात म्हटलं आहे. 
 

Web Title: information and broadcasting ministry frames rules to blacklist journalists claims increase in fake news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.