खासगी ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव विचाराधीन, नितीन गडकरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:32 AM2022-04-07T07:32:29+5:302022-04-07T07:33:09+5:30

Nitin Gadkari News: अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Information on Nitin Gadkari's proposal for a private trauma center is under consideration | खासगी ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव विचाराधीन, नितीन गडकरी यांची माहिती

खासगी ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव विचाराधीन, नितीन गडकरी यांची माहिती

Next

 नवी दिल्ली : अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या संदर्भात तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांनी प्रश्न विचारला होता. देशात दरवर्षी ५ लाखांवर अपघात होतात व या अपघातांमध्ये दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालयांवर अवलंबून न राहता, काही खासगी ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्तावावर निश्चितपणे विचार केला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 
काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी वाढत असून, विकासापासून अजूनही दूर आहे. यावर उत्तर देताना राय म्हणाले, जम्मू व काश्मीरमध्ये ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

राज्यसभा प्रश्नोत्तरे
मनरेगाच्या मजुरीत वाढ
देशात मनरेगा योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी दिली. या संदर्भात काँग्रेसचे शक्तीसिंग गोहील यांनी प्रश्न विचारला होता. मजुरीचे दर ठरविण्यासाठी काही निकष आहेत. 

Web Title: Information on Nitin Gadkari's proposal for a private trauma center is under consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.