इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या मुलाचा घटस्फोट
By Admin | Published: November 20, 2015 03:00 PM2015-11-20T15:00:28+5:302015-11-20T15:00:40+5:30
प्रख्यात उद्योजक व 'इन्फोसिस' कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन व टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांचा घटस्फोट झाला.
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २० - प्रख्यात उद्योजक व 'इन्फोसिस' कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन व टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांचा घटस्फोट झाला आहे. रोहन व लक्ष्मी यांचा चार वर्षांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. चेन्नईतील फॅमिली कोर्टात ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी परस्पर समंतीने घटस्फोट घेतला.
हार्वर्ड विद्यापीठात शिकलेला रोहन आणि येल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलेल्या लक्ष्मी यांचा ऑगस्ट २०१०मध्ये साखरपुडा झाला होता तर जून २०११ मध्ये चेन्नई येथे एका मोठ्या सोहळ्यात ते विवाहबंधनात अडकले. मात्र लगन्नानंतर काही महिन्यांनी त्यांचे पटेनासे झाले आणि दोन वर्षांपूर्वी ते दोघे वेगळे झाले. गेल्या वर्षी पार पडलेल्या लक्ष्मीच्या भावाच्या लग्नात मूर्ती कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने या दोघांमधील दुराव्याचे संकेत मिळाले होते. अखेर या वर्षी एप्रिल महिन्यात रोहन व लक्ष्मी यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला व ऑक्टोबरमध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले.