इन्फोसिस करणार 10,000 अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती!

By admin | Published: May 2, 2017 01:12 PM2017-05-02T13:12:45+5:302017-05-02T13:12:45+5:30

देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नामवंत असलेल्या इन्फोसिस या कंपनीने येत्या दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Infosys recruits 10,000 American employees! | इन्फोसिस करणार 10,000 अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती!

इन्फोसिस करणार 10,000 अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती!

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 02 - देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नामवंत असलेल्या इन्फोसिस या कंपनीने येत्या दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमेरिकेतील एच-1बी  व्हिसा नियमांच्या कठोर भूमिकामुळे होणा-या समस्यांवर उपाय म्हणून अमेरिकन कर्मचा-यांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या नोक-या देण्यासोबत आर्टिफिशल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, यूजर एक्सपिरियंस, क्लाऊड आणि बिग डेटा यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सुद्धा इन्फोसिस भाग भांडवल वाढविणार आहे. 
इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी सांगितले की, यावर्षी ऑगस्टमध्ये इंडियाना येथे ओपन करण्यात येणारा पहिला हब 2021 पर्यंत 2,000 अमेरिकन नागरिकांना नोकरी देईल. त्यानंतर तीन आणखी सेन्ट्रलमध्ये काही महिन्यातच नोक-यांसदर्भात ठरविले जाईल. या सेन्ट्रलमधून नागरिकांना फक्त टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचं ट्रेनिंग दिलं जाणार नाही, तर फायनान्स सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, रिटेल आणि एॅनर्जी यांसारख्या प्रमुख कंपन्या आणि क्लायंट्ससोबत काम केले जाणार आहे. 

Web Title: Infosys recruits 10,000 American employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.