नशिराबादला २० पासून उपोषण स्मार्ट व्हिलेज समितीचा पुढाकार
By admin | Published: June 8, 2016 11:03 PM2016-06-08T23:03:46+5:302016-06-08T23:03:46+5:30
नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
Next
न िराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.सुंदर व स्वच्छ गाव साकारून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन माजी खासदार वाय.जी.महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील दूषित पाणी, वाढते अतिक्रमण, पथदीप, बंद सायरन, शौचालय दैना, रस्त्यांची दुर्दशा, बिन तोट्यांचे नळ, तुंबलेल्या गटारी, घंटा नसलेल्या कचरा गाड्या, नदी पात्रातील केरकचरा आदी समस्यांबाबत उहापोह करीत स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतील निवेदन दिले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कच व डांबर टाकून डागडुजी होणे अपेक्षित आहे. रस्त्यांच्या दैनामुळे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना आहे. रस्ते मृत्यूला आमंत्रण देत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.अखेर स्मार्ट सिटीने दिलेल्या निवेदनाबाबत १९ जूनपर्यंत मार्ग न निघाल्यास २० जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत झाला. उपोषण करूनही दखल न घेतल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजीसाठी भीक मांगो आंदोलनाची तयारी समितीने दर्शविली आहे.बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, उपाध्यक्ष सैय्यद बरकत अली, विनोद रंधे, दगडू माळी, बंडू खंडारे, धनंजय वाणी, बंडू रत्नपारखी, अनिल वाणी, नजीरअली आदी उपस्थित होते. (वार्ताहर)