कुत्र्याच्या हल्ल्यात पुन्हा बालक जखमी
By admin | Published: February 24, 2016 10:42 PM2016-02-24T22:42:47+5:302016-02-24T22:42:47+5:30
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता वाढतच असून बुधवारी पुन्हा चार जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये एका १० वर्षीय बालकाच्या हाताला व पायाला कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Next
ज गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता वाढतच असून बुधवारी पुन्हा चार जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये एका १० वर्षीय बालकाच्या हाताला व पायाला कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कुत्र्यांच्या धुमाकुळामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना या दहशतीपासून दिलासा मिळतच नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील निमखेडी येथे बुधवारी दुपारी अतिश रामचंद्र सपकाळे (१०) हा बालक दुकानावर जात असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याच्या उजव्या पायाला व डाव्या हाताला कडाडून चावा घेतला. काही नागरिकांनी धाव घेत त्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली व त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या सोबतच शहरातील अर्जून नगर भागातील रमेश अर्जून माळी (४७), लालदू गोयर (२५), कुंदन नामदेव चौधरी (२५) यांनाही कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.