पंजाबमध्ये जवानाचा अंधाधूंद गोळीबार, चौघांचा मृत्यू
By admin | Published: October 20, 2015 03:56 PM2015-10-20T15:56:53+5:302015-10-20T17:13:38+5:30
पंजाबमधील संगरुर येथे सैन्याच्या जवानाने भरवस्तीत अंधाधूंद गोळीबार केल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. २० - पंजाबमधील संगरुर येथे सैन्याच्या जवानाने भरवस्तीत अंदाधुंद गोळीबार केल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले असून पोलीसांच्या गोळीबारात तो जवान ठार झाला आहे.
संगरुर या गावात मंगळवारी दुपारी रजेवर असलेल्या सैन्याचा शिपाई शेजारच्या तीन घरांमध्ये घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात सात जण जखमी झाले होते. यातील चौघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर तिघे जण जखमी आहेत. या जवानाचे नाव जगदिप असून गोळीबार सुरू असतानाच पोलीस घटनास्थळी हजर झाल्याचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक प्रितपाल सिंग यांनी सांगितले. पोलीसांनी त्या शिपायाला शरण येण्यास सांगितले, परंतु त्याने नकार देताच पोलीसांनी त्याच्यावर गोळीबार केला ज्यात तो ठार झाला.
या जवानाच्या हेतुबद्दल पोलीस तपास करत आहेत.