मूळ अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय
By admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:25+5:302015-07-20T23:59:25+5:30
नागपूर : खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावल्यामुळे मूळ अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नागपूर महापालिकेतही अशा पदोन्नत्या देण्यात आल्याने, अनुसूचित जमातीच्या मूळ कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यासंदर्भात नॅशनल आदिवासी पीपल्स महिला, स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप मडावी यांनी महापालिकेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी महापालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे. नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांना महापालिकेने पदावनत करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेने आदिवासी संशोधन संस्थेचे आयुक्त व जात वैधता प्रमाणपत्र समितीचे उपायुक्तांकडेही तक्रार केली आहे. यासंदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
Next
न गपूर : खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावल्यामुळे मूळ अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नागपूर महापालिकेतही अशा पदोन्नत्या देण्यात आल्याने, अनुसूचित जमातीच्या मूळ कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यासंदर्भात नॅशनल आदिवासी पीपल्स महिला, स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप मडावी यांनी महापालिकेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी महापालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे. नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांना महापालिकेने पदावनत करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेने आदिवासी संशोधन संस्थेचे आयुक्त व जात वैधता प्रमाणपत्र समितीचे उपायुक्तांकडेही तक्रार केली आहे. यासंदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.