गर्दी कमी करण्यासाठी बँका बोटांना लावणार शाई
By admin | Published: November 15, 2016 01:15 PM2016-11-15T13:15:43+5:302016-11-15T13:28:48+5:30
काही लोक वारंवार पैसे काढण्यासाठी, नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये येऊन उभे रहात आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - काही लोक वारंवार पैसे काढण्यासाठी, नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये येऊन उभे रहात आहेत. त्यामुळे बँकांबाहेर रांग वाढत असून मर्यादीत प्रमाणात लोकांना फायदा मिळत आहे असे केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
यावर उपाय म्हणून आता बँकांमध्ये येणा-या ग्राहकांच्या बोटांवर निवडणुकीत वापरतात तशी शाई लावली जाणार आहे. ज्यामुळे वारंवार पैसे काढण्यापासून, नोटा बदलण्यापासून रोखता येईल असे शशिकांत दास यांनी सांगितले. काही जण आपला काळा पैसा सफेद करुन घेत आहेत. तेच तेच लोक वेगवेगळया बँकांसमोर रांगा लावत असल्याने गर्दी वाढत आहे.
आणखी वाचा
संघटित पद्धतीने हा प्रकार सुरु आहे असे दास यांनी सांगितले. या प्रकाराना रोखण्यासाठी बोटांना शाई लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांनी चिंता करण्याचे कारण नाही. दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत आहे. सिस्टीममध्ये पुरेशा नोटा उपब्ध आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
- जनधन खात्यामध्ये ५० हजारापर्यंत रक्कम जमा करता येईल.
- प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी जमा होणा-या छोटया मुल्याच्या नोटा तात्काळ डिपॉझिट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत ओहोत जेणेकरुन लोकांना कॅश उपलब्ध होईल.
- काळजी करण्याचे कारण नाही, बँकांना पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
- ई-वॉलेटचा वापर वाढवण्यावर आणि एटीएम पूर्ववत होण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टीम्स बनवण्यात आल्या आहेत.
- बनावट नोटा रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
- मीठाचा पुरेसा साठा असून कोणी चिंता करण्याची गरज नाही.