EMOTIONAL! अंत्यसंस्कारावेळी त्या चिमुरड्यानं वडिलांची IAFची कॅप घालून केला सॅल्यूट, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 06:24 PM2021-12-11T18:24:32+5:302021-12-11T18:25:05+5:30
८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता.
८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान ( Prithvi Singh Chauhan) आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे MI-17 चॉपरचं सारथ्य होतं. पृथ्वी सिंग चौहान यांच्यावर शनिवारी आग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीय भावनिक झाले होते. चौहान यांच्या शवपेटीवर तिरंगा होता आणि त्यांची कॅप त्यावर ठेवली होती. यावेळी मनाला चटका देणारा प्रसंग घडला. चौहान यांच्या ७ वर्षांच्या मुलानं अलगत ती कॅप उचलली त्यावर पडलेली फुलं साफ केली अन् ती कॅप स्वतः परिधान करून त्यानं वडिलांना अखेरचा सॅल्यूट केला.
Innocent young son of Wg Cdr Prithvi Singh Chauhan wear his father's IAF cap during last rites in Agra. May God bless the grieved family 🇮🇳💐🙏🏽
— Neeraj Rajput (@neeraj_rajput) December 11, 2021
Video: @ravikantabppic.twitter.com/EYbFOYyMpG
शुक्रवारीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौहान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौहान यांच्या कुटुंबीयातील सदस्याला राज्य सरकारमध्ये नोकरी आणि ५० लाखांची मदत जाहीर केली.