पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी सरसावली तरुणाई युवा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम : गणेश कॉलनी परिसरात केली जनजागृती
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:45+5:302016-03-23T00:09:45+5:30
जळगाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे विविध चित्रफिल्स् दाखवण्यात आल्या.
Next
ज गाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे विविध चित्रफिल्स् दाखवण्यात आल्या.या कार्यक्रमप्रसंगी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीश निंबाळकर, भूषण पाटील, भाग्यश्री मगरे, प्रणव पाटील यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. तर श्रद्धा पाटील, अनघा नाफडे, विशाल इंगळे, रुपाली सोनवणे, भाग्यश्री महाजन, श्रद्धा पाटील, स्टेफी रंगारी यांनी विविध पोस्टर्सद्वारे पाण्याचे महत्त्व लोकांसमोर मांडले. जलदिनाचेही महत्त्व या वेळी पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम गुजराथी, हितेश शर्मा, भूषण पाटील, सुदर्शन पाटील, विरेंद्र पाटील, विवेक राजपूत, नीलेश प्रधान, मोहीत पटेल, प्रशांत सुलक्षणे, मयूर पाटील, पराग शिरसाळे, वैभव कहालकर, मोंटी लोणेरे यांनी सहकार्य केले.