्र्र्रप˜ा

By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:33+5:302015-02-14T23:50:33+5:30

मोटारसायकलची चोरी

Input | ्र्र्रप˜ा

्र्र्रप˜ा

Next
टारसायकलची चोरी
नवी मुंबई : उरण परिसरात उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. हिरोहोंडा कंपनीची आरजे-२२-एसई-८०२५ ही मोटारसायकल चोरीला गेली. या संदर्भात दशरथसिंग इंदरसिंग यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

रबाळेमध्ये घरफोडी
नवी मुंबई : रबाळेमधील सेक्टर-२९ परिसरात चोरीची घटना घडली. यशोदीप हाईट्स येथील दोन बंद घरांचे दरवाजे तोडून चोरटे आत शिरले. यामध्ये घरातील सोन्याचे दागिने आणि पैसे असा ६४,००० रुपये किमतीचा ऐवज पळवून नेला. या प्रकरणी पंकज कुमार यांनी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

कर्मचार्‍यांकडून फसवणूक
नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरातील टॅक्सो केन इंडस्ट्रीजमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. या कंपनीत काम करणार्‍या कामगारांनी फसवून कंपनीतला माल चोरून नेला. विनील ॲसिटेट मोनोमर केमिकल्सचे २ ड्रम आणि रिस्ट्रन मोनोमर केमिकल्सचे २ ड्रम असा ७४,८०० रुपये किमतीचा माल चोरून नेला. या घटनेसंदर्भात दिनकर कांबळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.


मोटर ट्रेलरची चोरी
नवी मुंबई : न्हावाशेवा परिसरातील चांदणी चौक जेएनपीटी रोडवर उभ्या केलेल्या मोटर ट्रेलरची चोरी झाली. टाटा कंपनीचा चाळीस फूट उंचीचा एमएच-१२-एफझेड-४२३० हा मोटर ट्रेलर चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी अर्जुन पाटील यांनी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.


सीबीडीत चोरी
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर-२४ परिसरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये चोरीची घटना घडली. हॉस्पिटलच्या उघड्या दरवाजावाटे आत शिरून चोरट्यांनी ९०,००० रुपये किमतीचे एअर कंडिशनचे वॉल पळवून नेले. या संदर्भात मनोज गोस्वामी यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

एनआरआय परिसरात घरफोडी
नवी मुंबई : बेलापूर गावातील सेक्टर-१९ व २० परिसरात चोरी झाल्याची घटना घडली. सागरबाग सोसायटीतील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञातांनी ५७,००० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अब्दुल शेख यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइलची चोरी
नवी मुंबई : ऐरोली मुकुंद चेक पोस्टच्या दिशेन पायी चालत असताना अज्ञाताने मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. मोबाइलवर संवाद साधत असताना अज्ञाताने पाठीमागून येऊन अशोककुमार सिन्हा यांचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Input

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.