महापालिकेच्या कारभाराची चौकशी

By Admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:53+5:302015-03-24T23:46:58+5:30

मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरप˜ी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी महापालिकेची आणि संबंधित उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी केली जाईल, तसेच त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Inquiries about municipal administration | महापालिकेच्या कारभाराची चौकशी

महापालिकेच्या कारभाराची चौकशी

googlenewsNext

मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरप˜ी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी महापालिकेची आणि संबंधित उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी केली जाईल, तसेच त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
आमदार फरांदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. महापालिकेचे विविध कर विभागाचे उपआयुक्त बहिरम, तसेच महापालिकेचा नगररचना विभाग आणि कामगार उपआयुक्त यांनी मिळकतीसंदर्भात दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर राज्यमंत्री पाटील यांनी महापालिकेत दोन विभागात अशा प्रकारे तफावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले. महापालिका सध्या कुंभमेळ्याच्या कामात व्यस्त आहे. कुंभमेळा संपल्यानंतर संपूर्ण मिळकतींचा सर्वे करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात येतील. अशा प्रकारच्या सर्वेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. जाणीवपूर्वक कोणत्याही अधिकार्‍याने माहिती देण्यात तफावत ठेवल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
एकलहरे केंद्रात क्षमता वाढ
एकलहरे औष्णिक वीज केंद्रात ६६० मेगावॉट वीज निर्मितीचा प्रस्ताव असून, तो मंजूर झाल्यानंतर क्षमता वाढू शकते, असे वीज मंत्र्यांनी आमदार फरांदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Web Title: Inquiries about municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.