बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी

By admin | Published: June 6, 2017 05:02 PM2017-06-06T17:02:58+5:302017-06-06T17:46:21+5:30

मिसा भारती यांना आयकर विभागाने चौकशीसाठी 12 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.

Inquiries Case: Misa Bharti to be probed on June 12 | बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी

Next
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 06 - कोट्यावधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती यांना आयकर विभागाने चौकशीसाठी 12 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. 
 
दिल्लीतील बिजवासन येथील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मिसा भारती यांना आयकर विभागाने चौकशीसाठी आज (दि.06) हजर राहण्यास  सांगितले होते. मात्र, मिसा भारती आयकर ऑफिसमध्ये हजर झाल्‍या नसून त्‍यांच्‍या जागी त्‍यांचे वकील हजर राहिले. वकिलांनी मिसा भारती यांना हजर होण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली. त्यावर आयकर विभागाने मिसा भारती यांना गैरहजर राहिल्याप्रकरणी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि 12 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर, मिसा भारतीचे पति शैलेश  यांची आयकर विभागाचे अधिकारी बुधवारी चौकशी करण्‍याची शक्‍यता आहे. आयकर विभागाने शैलेश आणि मीसा भारती यांना 16 मे रोजी समन्‍स पाठवले होते. 
 
दरम्यान, आठ हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्या होत्या.  शिवाय आयकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथील लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे छापे 1 हजार कोटींच्या अघोषित मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. 
 
 
 

Web Title: Inquiries Case: Misa Bharti to be probed on June 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.