सिद्धेश्वर पेठेतील जुगार अड्डय़ावर धाड गुन्हे शाखेची कारवाई : 84 हजारांची रक्कम जप्त

By admin | Published: September 6, 2015 11:54 PM2015-09-06T23:54:53+5:302015-09-06T23:54:53+5:30

सोलापूर : सिद्धेश्वर पेठेतील यशोधरा हॉस्पिटलच्या पाठीमागील बोळात एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 18 जणांना अटक करून 84 हजार 120 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

Inquiry of the proceedings of the offense branch of Siddheshwar Peth on a gambling plot: 84 thousand rupees seized | सिद्धेश्वर पेठेतील जुगार अड्डय़ावर धाड गुन्हे शाखेची कारवाई : 84 हजारांची रक्कम जप्त

सिद्धेश्वर पेठेतील जुगार अड्डय़ावर धाड गुन्हे शाखेची कारवाई : 84 हजारांची रक्कम जप्त

Next
लापूर : सिद्धेश्वर पेठेतील यशोधरा हॉस्पिटलच्या पाठीमागील बोळात एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 18 जणांना अटक करून 84 हजार 120 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
गुन्हे शाखेचे पोसई जोगधनकर व पथकातील पोलीस कर्मचारी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना मिनाज महिबूबसाब हत्तुरे यांच्या मालकीच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी छापा टाकला असता तेथे पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. जुगार खेळणारे 18 जण व त्यांच्या ताब्यातील 84 हजार 120 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत, सहा.पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.आर. जिरगे, सपोनि कोळेकर, पोसई जी.जे. जोगधनकर, पो.हे.कॉ. निलकंठ तोटदार, संपत नारायणकर, पो.हे.कॉ. मदन गायकवाड, पो.ना. उबाळे, पो.ना. विठ्ठल भोसले, आप्पासाहेब कोळी, खारे, पोलीस शिपाई सचिन गायकवाड यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Inquiry of the proceedings of the offense branch of Siddheshwar Peth on a gambling plot: 84 thousand rupees seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.