आयएनएस तिल्लनचांग नौदलात दाखल

By admin | Published: March 10, 2017 02:07 AM2017-03-10T02:07:54+5:302017-03-10T02:08:54+5:30

‘वॉटर जेट फास्ट अ‍ॅटेक क्राफ्ट’ प्रकारातील आयएनएस तिल्लनचांग नावाच्या जहाजाला भारतीय नौदलात दाखल करण्यात आले.

In the INS Tillan Chanch navy | आयएनएस तिल्लनचांग नौदलात दाखल

आयएनएस तिल्लनचांग नौदलात दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 10 - ‘वॉटर जेट फास्ट अ‍ॅटेक क्राफ्ट’ प्रकारातील आयएनएस तिल्लनचांग नावाच्या जहाजाला भारतीय नौदलात दाखल करण्यात आले.
कर्नाटकातील कारवार येथील नौदलाच्या मुख्यालयात हा समारंभ झाला. व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी तिल्लनचांगला नौदलाच्या ताफ्यात सामील केले. सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि तब्बल ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट गेल्या काही दिवसांपूर्वी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आयएनएस तिल्लनचांगला नौदलात दाखल करण्यात आले. 
दरम्यान, आयएनएस तिल्लनचांग हे तिसरे जहाज असून यापूर्वी आयएनएस तरमुगली व आयएनएस तिहायू या दोन जहाजांना सन २०१६ मध्ये नौदलात दाखल करण्यात आले आहे. याच प्रकारातील आणखी एक जहाज येत्या काळात दाखल होणार आहे.

Web Title: In the INS Tillan Chanch navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.