आधार नोंदणीसाठी १२० कीट प्राप्त तहसीलदारांना कीट वाटप : ० ते १८ वयोगटाच्या नोंदणीला प्राधान्य
By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:31+5:302016-02-08T22:55:31+5:30
जळगाव : शासनातर्फे शंभर टक्के आधार नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार आधार नोंदणीसाठी आवश्यक असलेले १२० कीट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. या कीटचे मंगळवारी तहसीलदारांना वाटप करण्यात येणार आहे.
Next
ज गाव : शासनातर्फे शंभर टक्के आधार नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार आधार नोंदणीसाठी आवश्यक असलेले १२० कीट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. या कीटचे मंगळवारी तहसीलदारांना वाटप करण्यात येणार आहे.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ातील ४४ लाख लोकसंख्येपैकी ३८ लाख ६५ हजार नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. जिल्ात आधार नोंदणीचे प्रमाण ८६.५ टक्के आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत संपूर्ण नागरिकांची आधार नोंदणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार यापूर्वी ३५ कीट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. नव्याने १५० कीट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात २० कीट यापूर्वी वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित आधार नोंदणीचे कीट मंगळवारी तहसीलदारांना वाटप करण्यात येणार आहे.आधार नोंदणी दरम्यान शून्य ते पाच वयोगटातील बालक आणि पाच ते १८ वयोगटातील मुलामुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यातील तहसीलदारांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या दृष्टीने तहसीलदारांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे.