नव्या सुरक्षा संकल्पनेचा आग्रह
By admin | Published: June 11, 2014 11:55 PM2014-06-11T23:55:05+5:302014-06-11T23:55:05+5:30
द्विपक्षीय संबंधांतील वाढत्या सहचर्याचे दर्शन घडवत चीनने आज बुधवारी भारत-चीन संबंध आणखी दृढ करण्यासाठी नव्या सुरक्षा संकल्पनेला चालना देण्याची गरज व्यक्त केली़
नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधांतील वाढत्या सहचर्याचे दर्शन घडवत चीनने आज बुधवारी भारत-चीन संबंध आणखी दृढ करण्यासाठी नव्या सुरक्षा संकल्पनेला चालना देण्याची गरज व्यक्त केली़
चिनी राजदूत वेई वेई यांनी येथील इन्स्टिट्यूट आॅफ डिफेन्स अॅण्ड स्ट्रॅटिजिक अफेअर्समधील एका व्याख्यानादरम्यान भारत-चीन संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली़ परस्पर विश्वासार्हता, समान लाभ आणि सहकार्यास वाव देणाऱ्या नव्या सुरक्षा संकल्पनेला चालना द्यायला हवी, असे ते म्हणाले़
संयुक्त युद्धसराव
येत्या नोव्हेंबरमध्ये भारत आणि चीनचे लष्कर आपला चौथा संयुक्त लष्करी सराव करतील़ परराष्ट्र मंत्रालयात चीन प्रकरणांचे प्रभारी संयुक्त सचिव गौतम बंबावाले यांनी बुधवारी ही माहिती दिली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)