घरातून काम करणाऱ्यांना निद्रानाश, पाठदुखीचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:23 AM2020-04-29T04:23:55+5:302020-04-29T04:24:08+5:30

अनेक तास काम करणाऱ्यांपैकी अनेकांना निद्रानाश, पाठदुखी, बैचैनी, तणाव आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. शरीराची हालचाल कमी झाल्याने वजनही वाढले आहे.

Insomnia, back pain for those who work from home | घरातून काम करणाऱ्यांना निद्रानाश, पाठदुखीचा त्रास

घरातून काम करणाऱ्यांना निद्रानाश, पाठदुखीचा त्रास

Next

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच)चा पर्याय अनेकांनी स्वीकारला असला तरी अनेक तास काम करणाऱ्यांपैकी अनेकांना निद्रानाश, पाठदुखी, बैचैनी, तणाव आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. शरीराची हालचाल कमी झाल्याने वजनही वाढले आहे.
लॉकडाऊनचा सध्या पाचवा आठवडा सुरू आहे. २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो १४ एप्रिलला मध्यरात्री संपणार होता; पण त्याला केंद्र सरकारने ३ मेपर्यंत मुदतवाढ दिली. देशातील कोरोना विषाणूची साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नसल्याने लॉकडाऊनला ३ मेनंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्व कंपन्यांनी आपली कार्यालये बंद ठेवली असून त्यांचे कर्मचारी घरूनच काम करत आहेत. दिल्लीतील एका आयटी कंपनीतल्या कर्मचाºयाने सांगितले की, दिवसभरातील अनेक तास मी लॅपटॉपवर काम करत असतो. तसेच मोबाइलवर कामाबद्दल बोलणे सुरू असते.
घरून काम करायला लागलो तेव्हा प्रारंभीच्या दिवसांत ती कार्यशैली मला आवडली होती. मात्र दिवस उलटू लागले तसतसे त्यातील उणिवा जाणवू लागल्या. घरातून काम करताना माझा संबंध फक्त इंटरनेटशीच येतो.
कार्यालयातून काम करताना अनेकदा सहकाºयांशी तेथील बैठकांमध्ये चर्चा व्हायच्या. आजूबाजूला खूप माणसे असायची. घरातून काम करताना, अनेक तास लॅपटॉप, मोबाइल स्क्रीनकडे पाहावे लागत असल्याने डोकेदुखीचे प्रमाण वाढले आहे. सतत बैठ्या कामामुळे पाठ दुखते.
।नियमित व्यायाम करण्याचा सल्ला
देशभरातील आयटी कंपन्यांच्या एकूण कर्मचाºयांपैकी ९० ते ९५ टक्के लोक लॉकडाऊनच्या काळात घरूनच काम करत आहेत. तासन् तास बसून काम केल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवू नये व शारीरिक हालचाल व्हावी, याकरिता रोज विविध प्रकारचे व्यायाम रोज करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून या दिला जात आहे. तसेच ध्यानधारणा करण्यासही सुचविण्यात आले आहे.

Web Title: Insomnia, back pain for those who work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.