औरंगाबाद-जळगाव रस्त्याची मुख्य सचिवांकडून पाहणी तक्रारींची दखल : दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी

By admin | Published: November 10, 2015 08:20 PM2015-11-10T20:20:18+5:302015-11-10T20:20:18+5:30

जळगाव : औरंगाबाद- अजिंठा या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी अचानक या मार्गाची पाहणी केली. यावेळी या मार्गाच्या जळगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या वाढीव निधीची मागणी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली.

Inspecting complaints from Chief Secretaries of Aurangabad-Jalgaon Road: 15 Crore demand for repair | औरंगाबाद-जळगाव रस्त्याची मुख्य सचिवांकडून पाहणी तक्रारींची दखल : दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी

औरंगाबाद-जळगाव रस्त्याची मुख्य सचिवांकडून पाहणी तक्रारींची दखल : दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी

Next
गाव : औरंगाबाद- अजिंठा या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी अचानक या मार्गाची पाहणी केली. यावेळी या मार्गाच्या जळगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या वाढीव निधीची मागणी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली.
औरंगाबाद ते अजिंठा या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी अचानक या मार्गाची पाहणी करण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांनी औरंगाबाद ते पहूर या दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर पहूर ते पाचोरा या उपरस्त्याचीदेखील त्यांनी पाहणी केली.
राज्य मार्गाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पाचोरा येथे बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता हेमंत पगारे, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यासह सर्व विभागाचे अभियंता उपस्थित होते.
बैठकीत आनंद कुलकर्णी यांनी अजिंठा ते औरंगाबाद येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच जळगाव जिल्‘ाच्या हद्दीतील रस्त्याचे उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शासनातर्फे सातबारा उतारे संगणीकरण केले जात आहे. मात्र संगणक ठेवण्यासाठी व तलाठी यांना बसण्यासाठीच जागा नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे चावडीच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी ७० लाखांच्या निधीची मागणी त्यांनी यावेळी केली.
आनंद कुलकर्णी यांनी या सर्व कामांसह आमदारांकडून करण्यात येणार्‍या विकास कामांसाठी लागणार्‍या निधीचा एकत्रित प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. निधीसाठी प्रस्ताव पाठविल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

चौकट
कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी औरंगाबाद ते जळगाव या राज्य मार्गावरील ५० किलोमीटरचा भाग हा जळगाव हद्दीत येत असल्याचे सांगितले. त्यापैकी २० किलोमीटरच्या कामाला सुरुवात झाली असून उर्वरित २८ किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे सांगितले. यासाठी लागणार्‍या निधीचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा अशी सूचना अतिरिक्त मुख्य सचिवांनी केली.

Web Title: Inspecting complaints from Chief Secretaries of Aurangabad-Jalgaon Road: 15 Crore demand for repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.