कापडणीसांच्या १२ आदेशांची तपासणी मनपा: नगररचनात आयुक्त ठाण मांडून

By Admin | Published: November 5, 2016 10:52 PM2016-11-05T22:52:09+5:302016-11-05T22:52:09+5:30

जळगाव : मनपातील तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागाशी संबधीत दिलेल्या १२ आदेशांसह या विभागातील विविध कामकाजांच्या तपासणीला आयुक्त जीवन सोनवणे यांनी आज सुरुवात केली यासाठी या विभागात ते ठाण मांडून होते.

Inspection of 12 orders of clippers Municipal Corporation: Municipal Commissioner, Thane | कापडणीसांच्या १२ आदेशांची तपासणी मनपा: नगररचनात आयुक्त ठाण मांडून

कापडणीसांच्या १२ आदेशांची तपासणी मनपा: नगररचनात आयुक्त ठाण मांडून

googlenewsNext
गाव : मनपातील तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागाशी संबधीत दिलेल्या १२ आदेशांसह या विभागातील विविध कामकाजांच्या तपासणीला आयुक्त जीवन सोनवणे यांनी आज सुरुवात केली यासाठी या विभागात ते ठाण मांडून होते.
नगररचना विभागातील अनागोंदीच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आहेत. कामांना होत असलेल्या उशिरामुळे नागरिकांचे नुकसान होते.बांधकाम व्यावसायिकांना या कामकाजाच्या पद्धतीचा सर्वाधिक फटका बसतो. या बाबतच्या तक्रारींची दखल घेऊन आयुक्तांनी काही मुद्दे काढून त्यांची तपासणी करण्यासाठी आपण विभागात येणार असल्याचे विभाग प्रमुख नगररचना सहायक संचालक चंद्रकात निकम यांना सांगितले होते. त्यानुसार तयारी करून ठेवण्याच्या सूचना होत्या. आज या तपासणीला मुहूर्त लाभला.
तपासणीचे असे आहेत मुद्दे
नगररचना विभागाशी संबंधित बांधकाम परवानगीची प्रलंबित प्रकरणे, भोगवटा प्रमाणपत्राची प्रलंबित प्रकरणे, टीडीआरशी संबंधित प्रकरणे, प्रलंबित लेआऊट प्रकरणे, शासकीय पत्र व्यवहाराचे प्रलंबित विषय, कृषि उत्पन्न बाजार समिती कामाचा प्रलंबित विषय, तत्कालीन पालिकेने वाटप केलेले ३९३ खुल्या जागांबाबतचा अहवाल महासभेपुढे ठेवायचा आहे त्याचे कामकाज कोठपर्यंत आले, शहरातील उपनगरांमध्ये भाजीबाजार सुरू करणे प्रस्तावित आहे त्यासाठी जागा शोधण्याचा विषय, कापणीसांनी नगररचना विभागाशी संबंधित काढलेले १२ आदेश, मेहरूण जंबो लेआऊट प्रकरणाच्या अहवालाबाबत सद्य स्थिती, अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत माहिती, मच्छी मार्केटची जागा आदी विषयांबाबत माहिती घेण्यास आयुक्तांनी शनिवारी सायंकाळी सुरुवात केली. यासाठी या विभागात आयुक्त सोनवणे, नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम व या विभागातील उपअभियंते रात्री उशिरापर्यंत बसून होते. विविध फाईंल्सची आयुक्तांनी यावेळी तपासणी केली.

Web Title: Inspection of 12 orders of clippers Municipal Corporation: Municipal Commissioner, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.