देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

By admin | Published: May 13, 2016 10:35 PM2016-05-13T22:35:55+5:302016-05-13T22:56:57+5:30

रमेश बुंदिले : सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

Inspection of drought conditions in Deola taluka | देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Next

रमेश बुंदिले : सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
देवळा : चार वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जनतेला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चालू वर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात भीषण दुष्काळ पडला असून, यावर ठोस उपाययोजना होणेकामी मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तालुकावार गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेऊन शासनाकडे तसा अहवाल कळवावा, असा आदेश दिला आहे. या उद्देशाने अमरावती जिल्‘ातील दर्यापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रमेश बुंदिले व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी देवळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली.
यावेळी मेशी येथील पाणीटंचाईसंदर्भात अधिकार्‍यांना दुरुस्ती कामाची निविदा निघाली असून, तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गुरुवारी अवकाळी पावसाने खामखेडा परिसरात शेतकर्‍यांच्या डाळींबबागा, घरांची पडझड, शेडनेट, आदिंची नुकसान झाले. त्यांना भेटी देऊन शासनामार्फत उपाययोजना करता येईल यासाठी संबंधित अधिकार्‍यांकडून पंचनामे करून त्वरित अहवाल मागितला आहे. वाजगाव येथील पांडु कुवर यांचा तसेच वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसदारांना तत्काळ ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येईल, असे बंुदिले यांनी सांगितले. बंुदिले त्यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती केदा अहेर, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शहराध्यक्ष किशोर अहेर, बापू देवरे, विजय अहेर, तहसीलदार कै लास पवार, गटविकास अधिकारी सी.एल. पवार, तालुका कृषी अधिकारी गुंजाळ, सहायक निबंधक एस.एस. गिते आदि दुष्काळी दौर्‍यात सहभागी झाले होते.
यावेळी देवळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रमेश बुंदिले यांनी शेतकर्‍यांनी निराश न होता दुष्काळाचा सामना करावा, शासनाच्या सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस असून, आमचे पदाधिकारी आपणापर्यंत सर्व योजना पोहोचविण्याकामी सहकार्य करतील. त्यासाठी आपण कृषी विभाग, सहकार विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग आदि कार्यालयांमध्ये जाऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. (वार्ताहर)
चौकट :- देवळा तालुक्यातील विजयनगर, श्रीरामपूर, खुंटेवाडी ही गावे महसुली गावात येत नसल्याने दुष्काळासाठी शासनाच्या वीज वितरण कंपनीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते नितीन शेवाळकर यांनी आमदार बुंदिले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून या गावांचा समावेश करून त्यांना अनुदानाच्या लाभ देण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Inspection of drought conditions in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.