अभिमानास्पद! पोलीस अधिकारी होताच बाबांना शेतात भेटायला आली लेक; हृदयस्पर्शी Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:37 AM2023-02-07T11:37:12+5:302023-02-07T11:39:27+5:30
पोलीस अधिकारी झाल्यानंतर मुलगी आपल्या आई-वडिलांसमोर आली. पोलिसांच्या गणवेशातील मुलीला पाहून पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आपल्या मुलांचं यश पाहून प्रत्येक आई-वडिलांना अभिमान वाटतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी झाल्यानंतर मुलगी आपल्या आई-वडिलांसमोर आली. पोलिसांच्या गणवेशातील मुलीला पाहून पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आईने मुलीला मिठी मारली, वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
हा व्हिडीओ मोनिका पुनियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या डिटेल्समध्ये त्यांनी लिहिले- "यामध्ये मी माझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या पालकांसोबत माझी पहिली भेट. दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टरच्या गणवेशात."
"स्टार लग गये मेरी बेटी को"
मोनिका दिल्ली पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. तिच्या व्हिडिओमध्ये, तिने दाखवले की जेव्हा तिच्या पालकांनी तिला पहिल्यांदा गणवेशात पाहिले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मोनिका तिच्या आईसमोर गेल्यावर आईने तिला मिठी मारली. "स्टार लग गये मेरी बेटी को" असं ती म्हणते. यानंतर मोनिका तिच्या वडिलांसमोर पोहोचते.
"मुलींना सक्षम आणि स्वावलंबी बनवा"
वडील शेतातून जात आहेत. मुलीला गणवेशात पाहून तेही आनंदी होतात आणि म्हणतात - मला माझ्या मुलीला पाहून खूप अभिमान वाटतो. मोनिकाचे वडील पुढे म्हणतात- तुम्ही लोक तुमच्या मुलीलाही घरातून जाऊ द्या आणि तिला हिच्यासारखे बनवा. मुलींना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचा संदेश त्यांनी दिला. मोनिकाच्या इन्स्टाग्राम बायोनुसार, तिने 20 हून अधिक सरकारी परीक्षा पास केल्या आहेत. तिच्या YouTube चॅनेलवर ती सर्व स्पर्धा परीक्षांशी संबंधित माहिती आणि टिप्स शेअर करत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"