'इन्स्पेक्टर' हरलीन मानच्या सुंदरतेने 'क्लीन बोल्ड', स्वतःला अटक करून घेण्याची मागणी !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 04:36 PM2017-11-22T16:36:09+5:302017-11-22T17:22:53+5:30
पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. गणवेशावर हरलीन मान असं नाव लिहिलं आहे.
आज इंटरनेटद्वारे तुम्ही कोणतीही माहिती मिळवू शकतात, देशासह जगभरात कोणते ट्रेंड सुरू आहेत याबाबतही तुम्ही माहिती घेऊ शकतात. इंटरनेटचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटादेखील आहे. कारण अनेकदा खोट्या बातम्या, अफवा येथे वाऱ्याच्या वेगानं पसरतात. अशीच एक घटना समोर आली आहे. पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. गणवेशावर हरलीन मान असं नाव लिहिलं आहे.
या सुंदर तरूणीचे फोटो पाहून अनेकजण अक्षरशः क्लीन बोल्ड झाले. लोकांनी तिच्याबाबत माहिती काढायला सुरूवात केली. अनेकांना ती पंजाब पोलिसात एसएचओ असल्याचं वाटलं. त्यानंतर तर लोकांनी तीचा फोटो शेअर करून स्वतःला अटक करण्याची मागणी करायला सुरूवात केली, आणि अल्पावधितच फेसबुक, ट्विटर , व्हॉट्सअॅप आदी ठिकाणी हा फोटो भलताच व्हायरल झाला.
Harleen Mann, Punjab Police..people are in queue to get arrested 😜 pic.twitter.com/bJaFF0hkES
— selya (@SelvaSelya) November 20, 2017
सेल्या नावाच्या एका युझरने हरलीन मान, पंजाब पोलीस,लोकं अटक होण्यासाठी रांगेत उभे आहेत, असं म्हटलं.
Harleen Mann, Punjab Police. Please arrest me 😹😭 pic.twitter.com/PDZMTx9O4x
— Rakesh Tiwari (@MrRakeshTiwari) November 19, 2017
राकेश तिवारीने ट्विट करून, हरलीन मान, पंजाब पोलीस, कृपया मला अटक करा असं म्हटलं.
This is SHO Punjab Police
— Shivendra (@dukelko) November 18, 2017
Harleen Mann☺
I surrender!😍🤗❤ pic.twitter.com/E7p9dD0zOS
पंजाब पोलीस एसएचओ, हरलीन मान, मी सरेंडर करतोय असं शिवेंद्र नावाच्या एका युझरने ट्विट केलं.
पण या फोटोची सत्यता कळाल्यावर सगळेच हैराण झाले. कारण हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो कायनात अरोरा नावाच्या एका अभिनेत्रीचा आहे. तिचा आगामी चित्रपट जग्गा ज्यूंदेईसाठी तिचा हा खास लूक आहे. ग्रॅंड मस्ती आणि खट्टा-मीठा यासारख्या चित्रपटात ती झळकली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर ती स्वतः पुढे आली. तोच फोटो शेअर करून हरलीन मान हे माझं आगामी सिनेमातील पात्र असल्याचं तिने सांगितलं. मी खरी पोलीस नाहीये, माझ्या फोनचा इनबॉक्स भरलाय, मला अटक करा अशे मेसेज लोक मला पाठवत आहेत. खूप जोक्स आणि फोटो मला फोरवर्ड केले जात आहेत.
हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं.