इन्स्पिरेशनची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
By admin | Published: June 1, 2015 10:13 PM2015-06-01T22:13:45+5:302015-06-02T00:14:40+5:30
नाशिक : येथील इन्स्पिरेशन अकॅडमीतर्फे आयोजित एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादासह संपन्न झाली. नियोजन न करता केलेला अभ्यास हा अयशस्वीतेचा पाया असतो, असे मत असिस्टंट कमांडंट राहुल गरुड यांनी व्यक्त केले. ते स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

सर्व विषयांचे ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, निरीक्षण आणि प्रश्नपत्रिकांचा सराव या सर्व बाबी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असतात, असे प्रतिपादन असिस्टंट कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स जीवन बच्छाव यांनी केले. पूर्व परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. तसेच अभ्यासबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शनदेखील महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. हर्षल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते पीएसआय परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
या तिन्ही कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली शेलार यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत प्रा. सुनील बच्छाव यांनी केले, तर प्रा. संदीप पाटील यांनी आभार मानले. (वा. प्र.)