देशरक्षणासाठी 'फुल प्रूफ' रणनीती आखणारा चाणक्य; अजित डोवाल यांचा प्रवास करेल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:03 PM2018-10-10T12:03:56+5:302018-10-10T12:20:12+5:30

देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

inspiring facts about national security advisor ajit doval | देशरक्षणासाठी 'फुल प्रूफ' रणनीती आखणारा चाणक्य; अजित डोवाल यांचा प्रवास करेल थक्क

देशरक्षणासाठी 'फुल प्रूफ' रणनीती आखणारा चाणक्य; अजित डोवाल यांचा प्रवास करेल थक्क

Next

भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेला सर्जिकल स्ट्राइक असो किंवा डोकलाम प्रकरणात चीनला जशास तसं उत्तर देण्याचं ठाम धोरण; ही रणनीती आखण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची होती. देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे अजित डोवाल हे देशातले सर्वशक्तिमान नोकरशहा बनणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप. पाकिस्तानात सात वर्षं भारताचे हेर म्हणून राहिलेल्या डोवाल यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

>> उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये २० जानेवारी १९४५ रोजी अजित डोवाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भारतीय लष्करात होते. त्यामुळे देशप्रेम आणि धाडस त्यांच्या रक्तातच होतं. 

>> अजमेर मिलिट्री स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. 

>> १९६८ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि चार वर्षांनी - १९७२ मध्ये ते गुप्तचर यंत्रणेत रुजू झाले. 

>> कारकिर्दीतील बराच काळ ते इंटेलिजन्स ब्यूरोमध्येच (IB) होते. या दरम्यान, पाकिस्तानमध्ये सात वर्षं ते भारताचे हेर होते. हे अत्यंत जोखमीचं काम करण्यासाठी त्यांनी धर्मही बदलला होता, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

>> १९८८ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या 'ऑपरेशन ब्लॅक थंडर'चं नेतृत्व अजित डोवाल यांनी केलं होतं.   

>> पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डना सोबत घेऊन त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. 

>> काश्मीर खोऱ्यात काम करताना त्यांनी अनेक दहशतवाद्यांना शरण यायला भाग पाडलं होतं. तब्बल ३३ वर्षं ते ईशान्य भाारत, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये हेर होते.

>> आपल्या धाडसी कामगिरीच्या जोरावर अजित डोवाल यांच्याकडे IBचं संचालकपद सोपवण्यात आलं होतं. या पदावरून ते २००५ मध्ये निवृत्त झाले.

>> ३० मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पाचवे सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

>> अलीकडच्या काळात, पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइक आणि डोकलाम वादात त्यांनी आखलेल्या रणनीतीचंही कौतुक झालं होतं. 

Web Title: inspiring facts about national security advisor ajit doval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.