फेसबुक मेसेंजर मध्ये आता इन्स्टंट व्हिडिओ फिचर

By admin | Published: September 2, 2016 01:08 PM2016-09-02T13:08:05+5:302016-09-02T13:08:05+5:30

झर्सना काही तरी नविन द्यावे यासाठी सर्वच सोशल मीडिया प्रयत्न करत असतात.याच स्पर्धेचा भाग म्हणून आता फेसबुक मेसेंजरने त्यांच्या युझर्स साठी इन्स्टंट व्हिडिओ फिचर उपलब्ध करून दिले आहे

Instant Video Feature Now in Facebook Messenger | फेसबुक मेसेंजर मध्ये आता इन्स्टंट व्हिडिओ फिचर

फेसबुक मेसेंजर मध्ये आता इन्स्टंट व्हिडिओ फिचर

Next
अनिल भापकर
ऑनलाइन लोकमत, दि. २ - दिवसेंदिवस सोशल मीडिया साईटस आपापल्या युझर्सना आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत आहे. काहीही करुन आपले युझर आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल साईट वर शिफ्ट नाही झाला पाहिजे यावर या कंपन्याचा कटाक्ष असतो.या स्पर्धेत युझर्सना काही तरी नविन द्यावे यासाठी सर्वच सोशल मीडिया प्रयत्न करत असतात.याच स्पर्धेचा भाग म्हणून आता फेसबुक मेसेंजरने त्यांच्या युझर्स साठी इन्स्टंट व्हिडिओ फिचर उपलब्ध करून दिले आहे.
 
काय आहे इन्स्टंट व्हिडिओ फिचर ?

समजा तुमच्या घरात तुमचं लहान बाळ आहे. त्या बाळाच्या बाललीला दररोज तुम्ही बघत आहात.एके दिवशी तुमचं बाळ पहिल्यांदा उभ राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा क्षण तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला .हा आनंद तुम्हाला तुमच्या जोडीदारा सोबत शेअर करायचा आहे . त्यावेळी तुम्ही काय कराल ? एकतर तुमच्या जोडीदाराला व्हिडिओ कॉल करून हे आनंददायी क्षण लाईव्ह दाखवाल किंवा तुमचा जोडीदार घरी आल्यावर त्याला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवाल . मात्र आता आणखी एक सोपा पर्याय फेसबुक मेसेंजर ने तुम्हाला उपलब्ध करून दिला तो म्हणजे इन्स्टंट व्हिडिओ. यामध्ये फेसबुक मेसेंजर वर चॅट करत असताना असे छोटे छोटे क्षण रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. म्हणजे यापुढे असा एखादा क्षण जो तुम्हाला इतरांसोबत शेअर करावा असे वाटते तो फेसबुक मेसेंजरच्या इन्स्टंट व्हिडिओ या फिचर चा वापर करून आपल्या परिजनांना पाठविता येऊ शकतो.


इन्स्टंट व्हिडिओ कसे पाठवाल ?
इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर वापरायचे असेल तर ज्याला इन्स्टंट व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्या स्मार्टफोनवर सुद्धा लेटेस्ट फेसबुक मेसेंजर ओपन असले पाहिजे तरच इन्स्टंट व्हिडिओ तुम्ही समोरच्याला पाठवू शकाल . इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर व्हिडिओ कॉलिंग पेक्षा पूर्णतः वेगळे आहे.व्हिडिओ कॉलिंगचे फिचर २०१५ पासूनच फेसबुक मेसेंजर मध्ये उपलब्ध आहे.काही वेळा आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविन्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा वेळी इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर कामी येईल.

Web Title: Instant Video Feature Now in Facebook Messenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.