टॉवर चौक ऐवजी यंदा जुन्या न.पा.ची जागा ४० जणांचे अर्ज प्राप्त : गणेश मूर्ती विक्रेत्यांना दिलासा
By Admin | Published: August 25, 2016 10:35 PM2016-08-25T22:35:30+5:302016-08-25T22:35:30+5:30
जळगाव : गणेश मूर्ती विक्रेत्यांना यंदा टॉवर चौका ऐवजी जुन्या न.पा. इमारतीची फुले मार्केट समोरील जागा व्यवसायासाठी दिली जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ज गाव : गणेश मूर्ती विक्रेत्यांना यंदा टॉवर चौका ऐवजी जुन्या न.पा. इमारतीची फुले मार्केट समोरील जागा व्यवसायासाठी दिली जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून टॉवर चौक ते चौबे शाळेपर्यंतच्या रस्त्यावर गणेशोत्सव काळात गणपती विक्रेते दुकाने लावत असत. गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दीमुळे या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होत असे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करण्याची मोहीम सुरू असल्याने महापालिकेकडून विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. अनेक दुकानांची गर्दीटॉवर चौकापासून, शहर पोलीस स्टेशन, घाणेकर चौक, जुने शाहू रुग्णालय, शिवाजी रोडचा दर्शनी भागात गणपती विक्रीसाठीची शेकडो दुकाने लागत असत. यात गणपती भोवती आरास करण्यासाठी विविध वस्तू व शोभा वाढविणारी फुले, थर्माकोलच्या वस्तू मंदिरे अशी एक ना अनेक प्रकारची दुकाने या परिसरात लागत असत. महापालिकेच्या कारवाई सत्रामुळे या भागात यंदा दुकाने लावण्यास नकार देण्यात आला होता. पर्यायी जागेची मागणीटॉवर चौक, शहर पोलीस स्टेशन व फुले मार्केट परिसरात वर्षानुवर्षे बसणार्या गणपती मूर्ती विक्रेत्यांनी याप्रश्नी प्रशासनातील अधिकार्यांची भेट घेऊन पर्यायी जागा मिळावी अशी मागणी केली होती. टॉवर चौक हा शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती परिसर असल्याने हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन व नागरिची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने या विक्रेत्यांना जुन्या न.पा. इमारतीच्या मोकळ्या जागेत दुकाने लावण्यास सूचना केली आहे. त्यानुसार अर्ज येण्यास सुरुवातही झाली आहे. गुरुवारअखेर ४० जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी दिली. -------