बंदोबस्ताबाबत लोकप्रतिनिधींच्या पोलीस आयुक्तांना सूचना

By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:42+5:302015-09-03T23:05:42+5:30

नाशिक : पहिल्या पर्वणीत भाविकांची गर्दी नसताना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून संपूर्ण शहरावासीयांना वेठीस धरल्याची परिस्थिती होती़ त्यामुळे किमान दुसर्‍या पर्वणीत तरी भाविकांबरोबरच नाशिककरांनाही दिलासा मिळेल असे बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी गुरुवारी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केल्या़ यातील काही सूचनांबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखविण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे़

Instructions to the Police Commissioner of the People's Republic | बंदोबस्ताबाबत लोकप्रतिनिधींच्या पोलीस आयुक्तांना सूचना

बंदोबस्ताबाबत लोकप्रतिनिधींच्या पोलीस आयुक्तांना सूचना

googlenewsNext
शिक : पहिल्या पर्वणीत भाविकांची गर्दी नसताना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून संपूर्ण शहरावासीयांना वेठीस धरल्याची परिस्थिती होती़ त्यामुळे किमान दुसर्‍या पर्वणीत तरी भाविकांबरोबरच नाशिककरांनाही दिलासा मिळेल असे बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी गुरुवारी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केल्या़ यातील काही सूचनांबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखविण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे़
पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी गुरुवारी सकाळी जिल्‘ातील आमदार व खासदार यांची सिंहस्थाच्या बंदोबस्तातील नियोजनाबाबत एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सुरतमधील जोडप्याचा विदारक अनुभव सांगितला़ तसेच शहरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना शहराची माहिती नसून ते भाविकांसोबत अरेरावी तसेच त्यांची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले़
पोलिसांनी गर्दी नसताना केलेले बॅरिकेडिंग, दुकाने बंद, तसेच भाविकांची होणारी पायपीट यामुळे अनेक वृद्ध भाविकांचे हाल झाले़ त्यामुळे प्रत्येक रस्त्यावरील भाविकांची पायपीट कमी करण्याच्या सूचना केल्या़ याबरोबरच सोशल मीडियावर नाशिकचे गोदावरीतील प्रदूषित पाणी, स्वाइन फ्लू यासारखा अपप्रचार केला जात असल्याने त्याचा परिणाम भाविकांवर होतो़ त्यामुळे अशा व्यक्तींवर सायबर सेलने लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली़
पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, डॉ़ राहुल अहेर यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Instructions to the Police Commissioner of the People's Republic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.