केंद्रीय मंत्र्यांसह अधिकारी रुजू, पीएमओकडून दोन दिवसांपूर्वीच निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:14 AM2020-04-14T06:14:33+5:302020-04-14T06:15:06+5:30
पीएमओकडून दोन दिवसांपूर्वीच निर्देश : १९ दिवसांनंतर नॉर्र्थ व साऊथ ब्लॉकमध्ये वर्दळ
नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’ मंगळवारी संपल्यानंतर कोरोनामुळे थबकलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याकरिता आखायच्या योजनांची तयारी करण्यासाठी बहुतांश केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री तसेच अतिरिक्त सचिवापासून वरच्या हुद्द्याचे अधिकारी सोमवारी आपापल्या कार्यालयांत रुजू झाले. त्यामुळे नॉर्थ व साऊथ ब्लाॉक तसेच शास्त्री भवनमधील विविध मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये तब्बल १९ दिवसांनंतर पुन्हा एकदा वर्दळ पाहायला मिळाली.
‘लॉकडाऊन’ मंगळवारी मध्यरात्री संपल्यानंतर प्रत्येक मंत्रालयाने कामाची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवायची याची आधीच तयारी करून ठेवावी, असे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून दोन दिवसांपूर्वी दिले गेल्याने इतके दिवस घरून किंवा ‘व्हिडिओ’ बैठका घेऊन काम करणारे मंत्री आपापल्या कार्यालयांत परतले.
कार्यालयात केवळ ३0% कर्मचारी
च्कार्यालये सुरू झाली तरी तेथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायचे असल्याने अत्यावश्यक असलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच मंत्रालयांमध्ये बोलावण्यात आले.
च्पुढील काही दिवस एवढ्याच संख्येने कर्मचारी आलटून-पालटून काम करतील, असे सांगण्यात आले.
च्प्रत्येक मंत्री, अधिकारी व कर्मचाºयाचे कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी ‘थर्मल स्कॅनिंग’ केले गेले.
च्प्रवेशद्वारांवर व कार्यालयांमध्येही ठिकठिकाणी सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहेत.