चार हजार रेशीम शेतक:यांना विमा सुरक्षा कवच
By admin | Published: September 14, 2014 01:42 AM2014-09-14T01:42:11+5:302014-09-14T01:42:11+5:30
राज्यातील शेतक:यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकर्षित करण्यासाठी रेशीम शेती आणि ही शेती करणा:या शेतक:याला वैयक्तिक विमा योजना लागू केली आहे.
Next
सुहास सुपासे - यवतमाळ
राज्यातील शेतक:यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकर्षित करण्यासाठी रेशीम शेती आणि ही शेती करणा:या शेतक:याला वैयक्तिक विमा योजना लागू केली आहे. रेशीम शेतीसाठी अशाप्रकारची योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
विदर्भातील शेतीची अवस्था पाहता अनेकांसाठी रेशीम शेती ही वरदान ठरत आहे. नापिकीमुळे सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिलत आज शंभर शेतकरी रेशीम शेती करीत आहे. त्यासोबत अमरावती विभागातील हजाराच्या घरात असलेल्या शेतक:यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशीम उत्पादक शेतक:यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासनाने राज्यातील रेशीम उद्योगाला विमा योजना लागू केली आहे.
राज्यात सध्या चार हजार 86 शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. कीटक संगोपन करताना एखादवेळी रेशीम किटकांवर रोगाचा प्रादूर्भाव होऊ शकतो. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्र सरकारने रेशीम उद्योगासाठी विमा योजना लागू करण्याचे निश्चित केले होते. त्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे. लाभाथ्र्याना वैयक्तिक विमा योजनाही लागू करण्यात आली आहे. तशा सूचना रेशीम संचालकांच्या आदेशावरून तुती व टसर लाभार्थीना जिल्हा रेशीम विकास अधिका:यांकडून देण्यात आल्या आहेत.
तुती रेशीमसाठी विमा हप्त्याची रक्कम अनुक्रमे बहुबार व दुबार जातीच्या किटक संगोपनासाठी 335 व 39क् रुपये प्रती शंभर अंडीपुंज आहे. विमा हप्त्यामध्ये लाभाथ्र्याचा सहभाग 25 टक्के आहे. यासाठी विमा संरक्षण अनुक्रमे 8 हजार व दहा हजार रुपये प्रती अंडीपुंज याप्रमाणो आहे. टसर उत्पादक रेशीम उत्पादक लाभाथ्र्याचा सहभाग 25 टक्केच आहे.
पहिल्या पिकासाठी 23क्, दुस:यासाठी 25क् व तिस:यासाठी 275 रुपये प्रती शंभर अंडीपुंज याप्रमाणो रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी विमा संरक्षण अनुक्रमे तीन हजार सहाशे, व तीन हजार आठशे रुपये आहे. वैयक्तिक अपघात संरक्षण विमा योजनेत लाभाथ्र्याला 14 रुपयांमध्ये 5क् हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच शेतक:यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असा आमचा प्रयत्न राहील. यापूर्वी ही योजना आली होती. परंतु अतिशय किरकोळ लाभ त्या वेळी त्यामध्ये देण्यात आल्याने शेतक:यांनी प्रतिसाद दिला नव्हता. परंतु आता मात्र रेशीम शेतीसाठी आणि वैयक्तिक अपघात विमासुद्धा अत्यल्प रकमेत देण्यात येणार आहे.
- राजेंद्र म्हात्रे, रेशीम विकास अधिकारी, यवतमाळ