सेन्सॉर बोर्डात निहलानींविरुद्ध बंडाचा झेंडा
By admin | Published: November 21, 2015 02:28 AM2015-11-21T02:28:07+5:302015-11-21T02:28:07+5:30
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याविरुद्ध मंडळातील काही सदस्यांनी बंडाचा झेंडा उभारला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती-प्रसारणमंत्री अरुण जेटली
नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याविरुद्ध मंडळातील काही सदस्यांनी बंडाचा झेंडा उभारला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती-प्रसारणमंत्री अरुण जेटली यांना कार्यपद्धतीकडे लक्ष वेधण्याची तयारी चालविली आहे. निहलानी यांनी एककल्ली कारभार चालविल्याबद्दल केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या (सीबीएफसी) चिंता व्यक्त केली आहे. चित्रपटातील शब्दांना एकतर्फी कैची लावली जात असून निहलानी मंडळाला विश्वासात न घेताच निर्णय घेतात. ते दुसऱ्याचे काहीही ऐकून न घेताच स्वकेंद्रित पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या या कारभाराकडे लक्ष वेधण्याची आम्ही तयारी चालविली आहे, असे मंडळाच्या सदस्याने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
आक्षेपार्ह शब्दांची यादी पुन्हा जारी करण्यात आली आहे. मी नियमानुसार काम करीत आहे. माझ्यावर केले जात असलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. ज्यांना कामच करायचे नाही असेच सदस्य तक्रार करीत आहेत.
- पहलाज निहलानी, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबद्दल कोणताही आदर किंवा संवेदनशीलता न दाखवता मंडळाने एककल्ली कारभार चालविल्याबद्दल मी व्यथित झालो आहे.
- रघू मेनन, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य