अखंडतेवर तडजोड नाही
By admin | Published: September 8, 2016 06:22 AM2016-09-08T06:22:08+5:302016-09-08T06:22:08+5:30
पाकिस्तानचे पाठिराखे असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका जम्मू आणि काश्मीरचा दौरा करून आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी घेतली
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पाकिस्तानचे पाठिराखे असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका जम्मू आणि काश्मीरचा दौरा करून आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी घेतली. देशाचे ऐक्य आणि अखंडता कायम राखण्याचा संकल्पही त्याने केला.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या बैठकीत निर्मला सीतारामन आणि जितेंद्र सिंह यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशी मतभेद होताच बैठकीचे वातावरण बिघडले. त्यामुळे जितेंद्र सिंह आणि सीताराम येचुरी बैठक संपायच्या आधीच निघून गेले. बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याने सशस्त्र दलांना असलेला विशेषाधिकार कायदा (आफ्स्पा) काढण्याची मागणी केली. परंतु हा कायदा मागे घेण्याचा सरकारचा विचार नाही. किंबहुना फुटीरवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी सरकार करीत आहे. सगळ््या पक्षांनी सहमतीनंतर निवेदन प्रसिद्धीस दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, सगळ््याच पक्षांना काश्मीरमधील परिस्थितीमुळे काळजी वाटत होती. ते सगळेच त्यावर तातडीने तोडगा निघावा या मताचे होते. हिंसेचा मार्ग सोडून चर्चेतून प्रश्न सुटायला हवा.