बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:22 AM2018-01-15T03:22:24+5:302018-01-15T03:22:55+5:30

मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे.

Intellect is necessary to reach people | बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

Next

मुंबई : मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे. विपश्यना पद्धतीतूनच बुद्धांना बोधीतत्त्व, बोधीसत्त्व आणि करुणाभावाचा परिचय झाला. त्यामुळे बुद्धविचार जगापर्यंत पोहोचविण्यात विपश्यना पद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाला बुद्धविचारांकडे नेण्यासाठी विपश्यनेचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या ४६ व्या तर इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आयोजित ‘आभार दिवस’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पॅगोडा येथील धम्मालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख आहे. मात्र, अध्यात्म आणि आस्था दर्शविणाºया परंपरेने महाराष्ट्राची सर्वाधिक प्रसिद्धी झाली. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाºया, बुद्धविचार सांगणाºया अजिंठाच्या लेणी त्याला साक्षी आहेत. बुद्धाने सांगितलेला करुणाभाव व्यक्त करणारे हे शिल्प जगाला करुणेचा संदेश देते. इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पॅगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.
विपश्यना साधनेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाºयांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी आहे. राज्य सरकारने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेच
शासकीय कर्मचाºयांना विपश्यनेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत
हे उल्लेखनीय असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. दान दिलेल्या रकमेतून
१६ एकर जागेवर ग्लोबल पॅगोडा
उभे आहे. यावेळी नव्या बांधण्यात येणाºया धम्मालयाच्या शिलालेखाचे
अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून - मुख्यमंत्री
विपश्यना ही स्वत:ला अंतर्मुख करणारी भारतीय परंपरा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. कालांतराने ही परंपरा भारतातूनच लुप्त झाली. मात्र, विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांनी म्यानमारमध्ये हेच ज्ञान शुद्धरूपात जतन करून ठेवले होते. गोयंका गुरुजींनी ते परत भारतात आणले आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. आंतरिक ज्ञानाच्या ताकदीमुळे मानवाचे कल्याण साधता येते. मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून होत आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी पॅगोडाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Intellect is necessary to reach people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.