राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:48 PM2020-08-21T13:48:00+5:302020-08-21T13:56:31+5:30

अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे.

Intelligence report sent to 3 states that details pakistan's plan to assassinate hindu leaders | राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

Next
ठळक मुद्देपाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेत्यांची हत्या करण्याचा कट आखत आहे.गुजरात एटीएसने रात्री उशिरा पकडला शार्प शूटरयासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट केले आहे. 

नवी दिल्ली - एकीकडे अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मोठा करट आखत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानराम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट केले आहे. 

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट जारी करताना म्हटले होते, की पाकिस्तान भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून, हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत आहे. टाइम्स नाऊकडे या अलर्टची कॉपी असल्याचेही समजते.

आरएसएस आणि भाजपा नेते निशाण्यावर -
अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे. या अलर्टनंतर या राज्यांतील गुप्तचर संस्थाही अलर्ट झाल्या आहेत. यानंतर गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री गोरधन जडफिया यांच्या हत्येच्या कथित कटाचा भांडाफोड करत एका शार्प शूटरला अटकही केली होती.

गुजरात एटीएसने रात्री उशिरा पकडला शार्प शूटर -
गुजरात एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा अहमदाबादच्या रिलीफ रोडवरील हॉटेल व्हिनसच्या रूम नंबर 105 मधून रात्री दीड वाजता छापा मारला होता. यावेळी रूममध्ये लपलेल्या आरोपी इरफान शेख उर्फ कालियाने (24) त्यांच्यावर दोन वेळा फायरिंग केली. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही. इरफान मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहे. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्प शूटरला अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या निकटवर्तीय असलेल्या गँगस्टर छोटा शकीलने पाठवले होते. 

नेत्यांची सुरक्षितता वाढवली - 
जडफिया 2002च्या दंगलीवेळी गृह राज्यमंत्री होते. यापूर्वी  गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री हरेन पांड्या यांचीही मार्च 2003 मध्ये हत्या झाली होती. आता त्या प्रमाणेच, पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कटा आखत असल्याचे मानले जाते आहे. यानुसारच आता हिंदुत्ववादी नेत्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

 

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

Web Title: Intelligence report sent to 3 states that details pakistan's plan to assassinate hindu leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.