आंतरजिल्हा बदलीचे २८ प्रस्ताव मनपा: नाहरकत साठी महापालिकेला साकडे
By Admin | Published: January 13, 2016 10:49 PM2016-01-13T22:49:29+5:302016-01-13T22:49:29+5:30
जळगाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे.
ज गाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे. आंतरजिल्हा बदली तसेच पती-पत्नी एकत्रीकरण, आप,आपसात व एकतर्फी बदली करून मिळावी असे मनपांतर्गत येणार्या शाळांमधील शिक्षकांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. येथे हव्यात बदल्याबदलीची मागणी करणार्या २८ शिक्षक व शिक्षिकांनी कल्याण डोंबिवली मनपा, जि.प. औरंगाबाद, मनपा नाशिक, जि.प.जळगाव, जिल्हा परिषद औरंगाबाद, वैजापापूर, न.पा. नंदुरबार, जिल्हा परिषद वाशिम, मनपा पुणे, न.पा. नांदुरा, न.पा. बुलढाणा, न.पा. चाळीसगाव, जिल्हा परिषद अमरावती, न.पा. उस्मानाबाद अशा ठिकाणी या शिक्षकांनी बदल्या मागितल्या आहेत. यात मराठी व उर्दू माध्यमाच्या उपशिक्षक व शिक्षिकांचा समावेश आहे. महापौरांना दिले पत्रया प्रश्नी या शिक्षकांनी महापौर राखी सोनवणे यांनी पत्र दिले होते. त्यावरून हा विषय महासभेत चर्चेला घेतला जावा असा प्रस्ताव महापौरांकडून नगरसचिवांकडे आला होता. त्यानुसार आता तो महासभेत चर्चेला येणार आहे. पगाराचे कारणमहापालिकेंतर्गत येणार्या शाळांमधील शिक्षकांचे मनपा ५० टक्के वाट्याचे जवळपास वर्षभरापासूनचे पगार झालेले नाहीत. यावरून वेळोवेळी शिक्षकांनी आंदोलनेही केली आहेत. अखेर हा विषय न्यायालयात गेला होता. याप्रश्नी ऑगस्ट २०१६ अखेर टप्प्याटप्प्याने शिक्षकांचे पगार दिले जावेत असे निदेर्ेश न्यायालयाने मनपास दिले आहेत. पगाराअभावी अनेकजण येथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे मनपा क्षेत्रात बोलले जात आहे.