हॉटेल सेवा उद्योगासाठी युवकांना आवाहन मनपा आयुक्तांनी साधला बेरोजगार युवक-युवतींसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2016 02:14 AM2016-02-09T02:14:31+5:302016-02-09T02:14:31+5:30

अकोला : हॉटेल सेवा उद्योगात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठा वाव आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविकेच्या माध्यमातून शासनाने तरुणांसाठी अल्पदरात प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना नोकरीची हमी देण्यासाठी पाउल उचलले आहे. या संधीचे सोने करण्यासाठी तरुणांनी समोर येण्याचे आवाहन सोमवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी केले. मनपाच्या मुख्य सभागृहात आयुक्तांनी बेरोजगार युवक-युवतींसोबत दिलखुलास संवाद साधला.

Interaction with unemployed youths, organized by Municipal Commissioner to invite youth for hotel service industry | हॉटेल सेवा उद्योगासाठी युवकांना आवाहन मनपा आयुक्तांनी साधला बेरोजगार युवक-युवतींसोबत संवाद

हॉटेल सेवा उद्योगासाठी युवकांना आवाहन मनपा आयुक्तांनी साधला बेरोजगार युवक-युवतींसोबत संवाद

Next
ोला : हॉटेल सेवा उद्योगात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठा वाव आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविकेच्या माध्यमातून शासनाने तरुणांसाठी अल्पदरात प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना नोकरीची हमी देण्यासाठी पाउल उचलले आहे. या संधीचे सोने करण्यासाठी तरुणांनी समोर येण्याचे आवाहन सोमवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी केले. मनपाच्या मुख्य सभागृहात आयुक्तांनी बेरोजगार युवक-युवतींसोबत दिलखुलास संवाद साधला.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून शासनाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची शंभर टक्के हमी देणार्‍या विविध विषयांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये टेक्सटाइल पार्क, हॉटेल मॅनेजमेंट आदींसह अभियांत्रिकीच्या विविध विषयांचा समावेश आहे. हॉटेल उद्योगाची भरभराट लक्षात घेता, या व्यवसायासाठी सुशिक्षित तरुणांची मोठी गरज आहे. पंचतारांकित हॉटेल किंवा जहाजांवरील हॉटेलमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या विषयावर आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील जसनागरा कॉलेज मॅनेजमेंटच्या वतीने सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शन कार्यक्र माचे आयोजन केले. मनपाच्या मुख्य सभागृहात जमा झालेल्या असंख्य तरुणांसोबत आयुक्तांनी संवाद साधत त्यांना हॉटेल सेवा उद्योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सिमरनजितसिंग नागरा यांनीही तरुणांना हॉटेल सेवा उद्योगाविषयी माहिती दिली. यावेळी उपमहापौर विनोद मापारी, उपायुक्त दिनकर बावस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बिलेवार यांनी तर आभार प्रदर्शन संजय राजनकर यांनी केले.

-फोटो-०९सीटीसीएल-२६--

Web Title: Interaction with unemployed youths, organized by Municipal Commissioner to invite youth for hotel service industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.