आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:02 AM2018-01-04T02:02:54+5:302018-01-04T02:03:09+5:30
आंतरजातीय विवाहांसाठी दिली जाणारी रक्कम प्रोत्साहन योजना आंतरधर्मीय विवाहांना लागू करण्याचा तूर्त विचार नाही, असे केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री विजय सांपला यांनी लोकसभेत सांगितले.
नवी दिल्ली - आंतरजातीय विवाहांसाठी दिली जाणारी रक्कम प्रोत्साहन योजना आंतरधर्मीय विवाहांना लागू करण्याचा तूर्त विचार नाही, असे केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री विजय सांपला यांनी लोकसभेत सांगितले.
ते म्हणाले की, केवळ आंतरजातीय विवाहांसाठी (यात वधू किंवा वर अनुसूचित जातीचा असल्यास) केंद्रातर्फे प्रोत्साहन योजना राबवली जाते. आंतरधर्मीय विवाहांचा त्यात समावेश करण्याचा विचार नाही.
या विवाहाची नोंद हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार करावी लागते. त्यांनी सांगितले की या प्रोत्साहनपर २.५ लाखांच्या रक्कमेत निम्मी रक्कम केंद्र सरकार व उर्वरित राज्य सरकार देते. केंद्रशासित प्रदेशांत ही रक्कम १०० टक्के केंद्र सरकारची असते. पात्र जोडप्याला दिल्या जात असलेल्या सध्याच्या २.५ लाखांच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव नाही.
तोही हुंडाच ठरेल की!
हुंडा न घेता विवाह करणा-या जोडप्याला अशी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सदस्यांनी विचारला असता, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या की, अशी काही योजना राबवली तर तो सरकारच्या वतीने दिलेला हुंडाच ठरेल.