शेतकऱ्यांचे 660 कोटी रुपयांचे व्याज माफ
By admin | Published: January 24, 2017 04:19 PM2017-01-24T16:19:32+5:302017-01-24T18:38:45+5:30
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेया बैठकीत शेतकऱ्यांचे 660.5 कोटीं रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेया बैठकीत शेतकऱ्यांचे 660.5 कोटीं रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ करण्यात आले आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी आता डिग्री तर पदविका ऐवजी पदवी प्रधान करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
गतवर्षी नोंव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे.
पीक कर्जावरील व्याजमाफीसह या मंत्रिमंडळात अनेक निर्णय घेण्यात आले. क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आहे. तसेच अनिसाबाद येथे 11.35 एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.