सोन्यावर मिळणार व्याज
By admin | Published: March 1, 2015 02:52 AM2015-03-01T02:52:33+5:302015-03-01T02:52:33+5:30
सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या आपल्या देशात सोन्याचा सुमारे २000 टन साठा आहे. हा साठा पडून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली आहे.
गोल्ड मॉनेटायजेशन : अशोकचक्र असलेली नाणी
नवी दिल्ली : सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या आपल्या देशात सोन्याचा सुमारे २000 टन साठा आहे. हा साठा पडून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली आहे. सुवर्ण बचत योजना आणि सोने तारण योजनेच्याऐवजी आता ही नवीन योजना अस्तित्वात येणार असून, या योजनेत खातेदाराला सोन्यावर व्याज; तर सराफी व्यावसायिकांना कर्ज मिळणार आहे. बँका तसेच अन्य सुवर्णव्यापाऱ्यांना सोन्याचे रोख रकमेत परिवर्तन करण्याची मुभा या योजनेत आहे. सोन्याच्या खरेदीला पर्याय म्हणून सुवर्ण बाँड आणण्यात येणार आहेत. या बाँडवर स्थिर दराने व्याज दिले जाणार आहे. सोन्याच्या बाजारातील किमतीनुसार या बाँडचे रोखीकरण करण्याचा पर्याय राहील. परदेशातून सोन्याच्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात आयात होते. हे लक्षात घेऊन देशांतर्गतच सुवर्णनाणे तयार करण्यात येणार असून, त्यावर ‘अशोकचक्र’ असेल.
च्गोल्ड मॉनेटायजेशन योजना आणून एक चांगले पाऊल उचलले असल्याची प्रतिक्रिया मनुभाई ज्वेलर्सचे संचालक समीर सागर यांनी व्यक्त केली.
च्भारतीयांना प्रत्यक्ष सोने जवळ बाळगण्यातच अधिक रस असतो हे खरे. मात्र हा नवा पर्याय आल्याने आता कल बदलेल आणि त्याचा एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही ते म्हणाले. ग्राहकांची मानसिकता बदलण्यासाठी खूप वेळ लागेल, त्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांवर याचा लगेच काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.