बिगर सरकारी पीएफवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 01:08 AM2018-10-10T01:08:20+5:302018-10-10T01:09:29+5:30

केंद्र सरकारने बिगर सरकारी भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात ०.४० टक्के वाढ केली आहे. यावर आता ७.६० ऐवजी किमान ८ टक्के व्याज मिळेल. ही वाढ आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी असेल. याचा लाभ सेवानिवृत्ती व ग्रॅच्युईटीच्या रकमेलाही लाभ मिळणार आहे.

Interest rates on non-government PF increased 0.4 percent | बिगर सरकारी पीएफवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ

बिगर सरकारी पीएफवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बिगर सरकारी भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात ०.४० टक्के वाढ केली आहे. यावर आता ७.६० ऐवजी किमान ८ टक्के व्याज मिळेल. ही वाढ आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी असेल. याचा लाभ सेवानिवृत्ती व ग्रॅच्युईटीच्या रकमेलाही लाभ मिळणार आहे.
ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेचे स्वत: व्यवस्थापन करतात त्यांचा बिगर सरकारी पीएफ योजनेत समावेश असतो. सरकारच्या विशेष ठेव योजनेंतर्गत हे लाभ कंपन्या कर्मचा-यांना देतात.
केंद्राने दोन आठवड्यांपूर्वीच अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारचा मानस यातून दिसून येतो. चालू खात्यातील तूट दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी या योजनेत अधिकाधिक पैसा गुंतवल्यास ही तूट कमी करण्यास मदत होईल, या आशेने केंद्राने ही व्याजदरवाढ केली आहे.

Web Title: Interest rates on non-government PF increased 0.4 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.