मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती गैरफायद्याची चौकशी आयुक्तांचे परिपत्रक : जिल्ह्यात मात्र गैरप्रकार नसल्याचे अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण
By admin | Published: March 11, 2016 12:27 AM2016-03-11T00:27:46+5:302016-03-11T00:27:46+5:30
जळगाव- जिल्हाभरातील काही महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ पात्रता नसताना घेतला आहे की नाही याची शाहनिशा करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांनी जिल्ातील अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष समाज कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, काही महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे.
Next
ज गाव- जिल्हाभरातील काही महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ पात्रता नसताना घेतला आहे की नाही याची शाहनिशा करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांनी जिल्ातील अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष समाज कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, काही महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे. सामाईक प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश न घेतलेल्या, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याची शंका पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने उपस्थित केली आहे. अर्थातच अशा शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय नसताना, नियमात नसताना घेतल्याप्रकरणी महाविद्यालयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विशेष समाज कल्याण विभागाने सरसकट सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन करून असा प्रकार असेल तर दोन दिवसात अनुज्ञेय नसलेल्या शिष्यवृत्तीची घेतलेली रक्कम चलनाद्वारे विशेष समाज कल्याण विभागाकडे जमा करावी, असे आवाहन केले आहे. या आवाहनास गुरुवारपर्यंत कुठल्याही महाविद्यालयाने प्रतिसाद दिलेला नव्हता, अशी माहिती मिळाली. विदर्भात गैरप्रकार, म्हणून खबरदारीगडचिरोली, वर्धा, बुलडाणा आदी भागात मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यासंबंधी विशेष चौकशी पथकाद्वारे (एसआयटी) शासनाने चौकशी हाती घेतली आहे. ही चौकशी जिल्ात प्रस्तावित नाही. परंतु खबरदारी म्हणून, गैरप्रकार होऊ नये, म्हणून विशेष समाज कल्याण विभागाने प्रसार माध्यमांमध्ये जाहीरात प्रसिद्ध करून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा गैरफायदा घेतलेला असल्यास घेतलेली रक्कम परत करा, असे आवाहन केले. जिल्ात कुठल्याही महाविद्यालयात असा प्रकार झाल्याचे समोर आलेले नाही. किंवा चौकशी सुरू नाही, असे स्पष्टीकरण विशेष समाज कल्याण विभागातील अतिरिक्त आयुक्त राकेश पाटील यांनी दिले.