केवळ ९ रुपयांत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, या कंपनीची धमाकेदार ऑफर, या मार्गांवर करता येईल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:30 PM2022-08-05T18:30:32+5:302022-08-05T18:31:13+5:30
International Flights: जर तुम्ही स्वस्तामध्ये परदेश प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. वियतजेट एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे.
नवी दिल्ली - जर तुम्ही स्वस्तामध्ये परदेश प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. वियतजेट एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. या ऑफरमधून तुम्हाला भारतातून व्हिएतनामदरम्यान केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येईल. या ऑफरसाठीची बुकिंग ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या ऑफरची मुदत २६ ऑगस्टपर्यंत आहे.
या ऑफरमध्ये तुम्ही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रोजी जर तुम्ही तिकीट बुकींग केलं तरच तुम्हाला ही संधी मिळू शकते. विमान वाहतूक कंपनी विएतजेटने दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी माहिती देताना कंपनीने सांगितले की, भारतामधून व्हिएतनामध्ये विमान प्रवासासाठी कंपनी ३० हजार प्रमोशनल तिकिटे ऑफर करत आहे. या तिकिटांची किंमत ९ रुपयांपासून सुरू होत आहे. या ऑफरनुसार १५ ऑगस्ट २०२२ ते २६ मार्च २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठीची बुकिंग ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. एअरलाईन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ४ ते २६ ऑगस्टदरम्यान, प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंगवर प्रमोशनल तिकिटाचा लाभ घेता येणार आहे.
एअरलाइन कंपनी विएतजेटचे कमर्शियल डायरेक्टर जय. एल. लिंगेश्वर यांनी सांगितले की, विएटजेट १७ मार्गांसाठी भारत आणि व्हिएतनामदरम्यान डायरेक्ट फ्लाईट ऑपरेट करणार आहे. त्यानंतरही एअरलाइन्स भारताच्या मुख्य डेस्टिनेशनला दक्षिण पूर्व आशिया, पूर्वोत्तर आशिया आणि आशिया-पॅसिफिकसोबत जोण्यासाठी विचार करत आहे.
त्यांनी सांगितले की, पाच मुख्य भारतीय शहरांतील प्रवासी आता दा नांगचे सुंदर शहर आणि नंतर होई एन, ह्यु इंपीरियल, माय सन अभयारण्य आणि जगातील सर्वात मोठी गुहा सोन डुंग सह आसपासच्या पर्यटनस्थळांच्या प्रवासासाठी डायरेक्ट फ्लाईट घेऊ शकता. दरम्यान, व्हिएतनामचे राजदूत फाम सान चाऊ यांनी सांगितले की, भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत आहे. व्हिसा प्रक्रियेला सरळसोपं केलं आहे. त्यासाठी आता दूतावासात जाण्याची गरज नाही. कंपनीने सांगितले की, सध्या व्हिएतनाममध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत.