आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचा निर्णय बदलला; बंदी 31 जुलैपर्यंत वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:33 PM2020-07-03T16:33:34+5:302020-07-03T16:57:52+5:30
देशामध्ये 25 मे पासून विमानोड्डाणे सुरु करण्यात आली आहेत. 21 मे रोजी यावर गाईडलाईन जारी करण्यात आले होते. मात्र, अनलॉक 2 ची घोषणा करताना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदीच ठेवली होती.
नवी दिल्ली : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवर प्रतिबंध लावण्यात आले होते. ते काही दिवसांपूर्वी 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा हे प्रतिबंध 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे.
देशामध्ये 25 मे पासून विमानोड्डाणे सुरु करण्यात आली आहेत. 21 मे रोजी यावर गाईडलाईन जारी करण्यात आले होते. मात्र, अनलॉक 2 ची घोषणा करताना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदीच ठेवली होती. डीजीसीएच्या या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीची विमाने आणि विशेष विमानसेवेवर काहीही परिणाम होणार नाही. डीजीसीएने 26 जूनला आदेश काढत 15 जुलैपर्यंत विमान उड्डाणंवर बंदी कायम ठेवली होती. वंदे भारत मोहिम 6 मे पासून सुरु करण्यात आली आहे. याद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे.
देशातील जवळपास 20 विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. या विमानतळांद्वारे 55 देशांच्या 80 शहरांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या जगभरात कोरोनाचे थैमान आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोखणे गरजेचे आहे. 2019 मध्ये भारतातून 7 कोटी लोकांनी आंतरराष्ट्रीय विमानांतून प्रवास केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
30-30 रुपयांना विकले 'कोरोनाचे औषध'; आता कारवाई होणार
कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे
मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख
OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV
बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार
मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले
मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने