आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:59 AM2022-03-09T06:59:11+5:302022-03-09T06:59:26+5:30

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती.

International flights will resume regularly after 2 years of corona pandemic; Decision to allow from March 27 | आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना संख्येत घट होत असल्याने ही घोषणा करण्यात आली.  

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. जुलै २०२० पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि ३७ देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, नवीन आदेशानुसार एअर बबल प्रणालीही संपुष्टात येईल.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ तसेच मालवाहतुकीला गती मिळणार आहे.
    - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी 
    विमान वाहतूक समिती, औरंगाबाद 
    पर्यटन विकास प्रतिष्ठान. (एटीडीएफ)

Web Title: International flights will resume regularly after 2 years of corona pandemic; Decision to allow from March 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.