आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे झाली ‘लॉक’; वाचा, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:58 AM2021-06-09T05:58:58+5:302021-06-09T05:59:35+5:30
International websites were 'locked' : संकेतस्थळांचा वेग कमी होण्यामागे कंटेंट डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (सीडीएन) प्रोव्हायडर हे एक कारण असू शकते, असा अंदाज आहे.
नवी दिल्ली : न्यूयाॅर्क टाइम्स, सीएनएन, द गार्डियन, वॉल स्ट्रीट जनरल, वॉशिंग्टन पोस्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळांना मंगळवारी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. वर उल्लेखलेल्या कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास ‘५०३ एरर’ असा संदेश दाखवत असल्याचे निदर्शनास आले.
कारण काय?
- संकेतस्थळांचा वेग कमी होण्यामागे कंटेंट डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (सीडीएन) प्रोव्हायडर हे एक कारण असू शकते, असा अंदाज आहे.
- सीडीएन हे एक प्रॉक्सी सर्व्हरचे नेटवर्क आहे.
- सर्व भौगोलिक सीमा ओलांडून इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सीडीएनचा वापर केला जातो. त्यांचे डेटा सेंटर्स विस्तृत क्षेत्रात कार्यरत असतात.
- बीबीसी, ब्रिटिश सरकारची जीओव्ही डॉट यूके, द गार्डियन, - फायनान्शिअल एक्स्प्रेस, न्यूयॉर्क टाइम्स, रेडिट, ॲमेझॉन, सीएनएन, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जनरल, पे पॅल, ट्विच, ट्विटर, एचबीओ मॅक्स, हुलू. या संकेतस्थळांवर परिणाम झाला.