International Yoga Day 2021 : कोरोना संकट काळात योग आशेचा किरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:18 AM2021-06-21T08:18:12+5:302021-06-21T08:24:42+5:30
International Yoga Day 2021 : यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस' आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी "जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. परंतु आपण सगळ्यांनी पाहिले की, अशा कठीण प्रसंगी योगासने आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे माध्यम बनले. योगमुळे लोकांचा विश्वास वाढला की, या महामारीविरोधात आम्ही लढू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
"जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढले आहे. पूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही," असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, भारताने जेव्हा आरोग्याचा उल्लेख केला तेव्हा तो केवळ शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत नव्हता. योगासनांमध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही भर देण्यात आला आहे. योगासनांमुळे तणावापासून मजबुतीपर्यंत आणि निगेटिव्हिटीपासून क्रिएटिव्हिटीचा मार्ग दाखवतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, "महान तमिळ संत श्री तिरुवल्लुवर जी म्हणाले की एखादा आजार असेल तर त्याच्या मुळाशी जा, रोगाचे कारण काय आहे ते शोधा, मग त्याचे उपचार सुरू करा. भारतातील ऋषींनी, भारताने जेव्हा आरोग्यासंबंधी चर्चा केली, याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्याचा नाही राहिला. त्यामुळे योगामध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही जास्त जोर देण्यात आला आहे."
In collaboration with WHO, India has taken another important step. Now there will be M-Yoga app, which will have yoga training videos in different languages for people across the world. This will help us in our 'One World, One Health' motto.#InternationalYogaDaypic.twitter.com/SKVpeUoQt7
— ANI (@ANI) June 21, 2021
'जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार'
भारताने यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी योगासनाचे महत्त्व संपूर्ण जगभरात समजावं ही एकमेव भावना होती. आज या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगासनं केली.https://t.co/CbvSFUjpi9#InternationalDayOfYoga#nitingadkaripic.twitter.com/3OEsqtiWBP
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021
'योग फॉर वेलनेस'
यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस' आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्यावर केंद्रित आहे. कोरोना संसर्गामुळे यंदाही योग दिनाचे कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आले आहेत