जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:58 IST2020-01-16T03:50:25+5:302020-01-16T06:58:28+5:30

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Internet service started in five districts including Jammu; Exception to the valley; For only seven days | जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

जम्मू : सर्वोच्च न्यायालयाने काश्मीर प्रशासनाची कानउघाडणी केल्यानंतर जम्मू-काश्मीरध्ये सुमारे साडेपाच महिन्यांनंतर बुधवारी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. मात्र, ती केवळ जम्मू विभागांमधील पाच जिल्ह्यांसाठीच असून, काश्मीर खोºयातील एकाही जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही.

आता केवळ सात दिवसांसाठीच पोस्टपेड मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून, नंतर आढावा घेऊ न ती कायम ठेवायची किंवा अन्य जिल्ह्यांमध्येही लागू करायची याबाबत निर्णय होणार आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, सांबा, कठुआ या पाच जिल्ह्यांत पोस्टपेड मोबाईलवरच आज ही इंटरनेट सेवा सुरू झाली.

जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांतही ती सुरू झाली तरी दुपारपर्यंत इंटरनेट मिळतच नसल्याची तक्रार अनेक मोबाईलधारक करताना दिसत होते. तिथे टू-जी सेवाच असल्याने ती अतिशय संथ आहे आणि अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, अशा तक्रारी काहींनी केल्या.
गृह विभागाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी दिली. काश्मीर विभागामध्ये ४00 इंटरनेट किआॅस्क सुरू करण्यात येणार असल्याचेही गृह विभागाने म्हटले आहे. रुग्णालये, बँका, सरकारी कार्यालये येथे तसेच इंटरनेट सेवा देणाºया संस्थांना ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध होणार आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हॉटेल, यात्रा कंपन्या तसेच टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनाही इंटरनेट उपलब्ध होणार आहे.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर सहा महिन्यांनी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये आक्रमक राजकीय जनसंपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. या आक्रमक मोहिमेला अंतिम स्वरूप दिले जात असून, लोकांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक मोठी तुकडीच जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास करील. लोकांशी संपर्क साधण्यासाठीच्या या फार मोठ्या मोहिमेत मोदी सरकारमधील दुसºया फळीतील मंत्री सहभागी असतील व ते केंद्र सरकार राबवत असलेली कल्याणकारी धोरणे व कार्यक्रमांचा प्रसार करतील. या मोहिमेचा हेतू हा लोकांंनी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी व त्यांना त्यात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधानांनी अंतिम स्वरूप दिलेली हा महत्त्वाची जनसंपर्क मोहीम असल्याचे मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
आठवडाभर चालणाºया या संपर्क मोहिमेत गृहराज्यमंत्री जी. कृष्ण रेड्डी, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, जितेंद्र सिंह आणि पीयूष गोयल व इतर सहभागी होतील.

 

Web Title: Internet service started in five districts including Jammu; Exception to the valley; For only seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.